Skip to main content

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

शेतकरी आणि बकरे

 शेतकरी आणि बकरे | Shetkari aani Bakare
एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तेव्हा एका शेतकऱ्याने आपल्याजवळच्या कोंबडया मारून खाल्ल्या. कोंबडया संपल्यावर त्याने कोकरांना मारून खाण्यास सुरुवात केली. ते पाहताच सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार. त्याऐवजी आपण आधीच येथून पळून गेलेले बरे. असा विचार करून ते तेथून पळून गेले.
तात्पर्य - पुढच्या संकटाची जाणीव होताच, ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय.

Comments

Popular posts from this blog

The Crow and Snake | मराठी कथा | 3D Moral Stories For Kids in Marathi | Moral Values Stories Marathi

म्हातारे मांजर आणि उंदीर

  एक मांजर इतके म्हातारे झाले की, उंदराच्या मागे लागून त्यांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्यास राहिले नाही. मग उंदीर पकडण्याची सोपी युक्ती त्याने योजिली. घरात धान्याची पोती ठेवली होती, त्यातील धान्य खाण्यास रात्री उंदीर येत असत, हे लक्षात घेऊन ते मांजर एका पोत्याच्या आड उंदरांची वाट पाहात लपून बसले. हा प्रकार जवळच एक म्हातारा उंदीर बसला होता त्याने पाहिला व इतर उंदरांस कळविला. त्यामुळे एकही उंदीर त्या रात्री पोत्याजवळ आला नाही. अशा रीतीने त्या मांजराची ती युक्ती फुकट गेली. तात्पर्य - लुच्चेगिरी कितीही चातुर्याने केलेली असली, तरी ती बहुधा उघडकीस आल्याशिवाय राहात नाही.

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales