दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन चालु होत. दिवंगत श्री चिंतामणराव देशमुख हे
त्या वेळी भारताचे अर्थंमंत्री होते. एका दिवशी लोकसभेत आपल्या पंचवार्षिक
योजनांच्या परिपुर्तीसाठी भारत परराष्ट्रांकडुन घेत असलेल्या कर्जाच्या
संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्षीय खासदार यांच्यात कडाक्याची चर्चा चालु
झाली असता, ओरिसातील एक विरोधी पक्षीय खासदार श्री. पी. सी. भंजदेव
म्हणाले, ‘परराष्ट्रांकडुन कर्जे काढून देशाला कर्जबाजारी करणाच्या या
धोरणामुळे संबंधित मंत्रीमहोदय हे देशाचे शत्रु असल्याचे सिध्द होत आहे.
कारण सुभाषितकारांनी म्हटलचं आहे, ऋणकर्ता पिता शत्रु :।’
श्री. भजंदेव यांचे हे विधान ऎकताच, अर्थशास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेले चिंतामणराव देशमुख तत्काल उभे राहिले आणि श्री. भजंदेव यांनी उदधृत केलेल्या संस्कृत वचनांची समस्यापूर्ती करण्याची सभापतींकडे परवानगी मागून ते एकून उपस्थित खासदारांना उद्देशून म्हणाले, ‘श्री. भजंदेव यांनी केलेला आरोप पुर्णतया चुकीचा आहे. कारण..

ऋणकर्ता पिता शत्रुर्न तु मंत्रि: परं तथा।चिंतामणरावांनी केलेल्या चातूर्यपूर्ण समस्यापूर्तीमुळे चकित झालेल्या खासदारांनी पक्षभेद विसरुन त्यांना टाळ्यांची जोरदार दाद दिली; कारण त्यांनी समस्या पूर्तीतून राष्ट्राच्या विकासाबाबतचा एक मौलिक सिध्दांत मांडला होता.
ऋणं दु:खाय पुत्राणां, राष्ट्राणां तु हिताय तत।
अर्थ - कर्ज करुन ठेवणारा पिता हा जरी शत्रु असला, तरी मंत्री मात्र तसा ठरत नाही. कारण पित्याने केलेले कर्ज मुलाच्या दु:खाला कारणीभूत असते. राष्ट्रांच्या बाबतीत मात्र ते त्यांच्या हितासाठी केलेले असते.
Comments
Post a Comment