एक खाटीक आपल्या दुकानात बेसावधपणे बसला असता, एका कुत्र्याने त्याच्या दुकानातून मांसाचा एक मोठा तुकडा पळविला. हा प्रकार पाहून खाटीक कुत्र्यास म्हणतो, ‘गडया, तू माझे मांस चोरून मला जे शहाणपण शिकविलेस ते मी कधीही विसरणार नाही.’
तात्पर्य - पदरची एखादी जिन्नस गेल्यावर मनुष्यास जे ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान तो सहसा विसरत नाही.
Comments
Post a Comment