Skip to main content

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

समर्थ रामदास स्वामी

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ।
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥समर्थ रामदास स्वामी
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे. भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. परंतु ‘चातुर्य’ म्हणजे काय, हे ठाऊक आहे? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा, मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन. माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला तर आपण या प्रसंगात का सापडलो याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो, थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते.
जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो..
“विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.”
अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून “समर्थ रामदास स्वामी” म्हणतात..
उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।
धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ॥समर्थ रामदास स्वामी
भावार्थ: बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

Comments

Popular posts from this blog

Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Animated Marathi Story

Eka Makadane Kadhale Dukan|एका माकडाने काढले दुकान | Ek Divas Achanak | Marathi Songs by JingleToons

The Crow and Snake | मराठी कथा | 3D Moral Stories For Kids in Marathi | Moral Values Stories Marathi