एका उन्मत्त झालेल्या गाढवाने एका
सिंहास निष्कारण शिव्या दिल्या. त्या ऐकताच सिंहास मोठा संताप आला, परंतु
शिव्या देणारा प्राणी गाढव आहे, हे पाहताच त्याने आपला संताप आवरला. त्या
गाढवाकडे ढुंकूनही न पाहता किंवा त्याला एक शब्दही न बोलता तो सिंह आपल्या
वाटेने चालता झाला.
तात्पर्य- जे खरे थोर आहेत, ते हलकट लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.
Comments
Post a Comment