भूकंप होत असतांना छप्पर पडून देवाला
लागू नये, यासाठी पिंडीवर ओणवा होणारा
भक्त पुजारी आणि देवळातून पळून जाणारा राजा !
एक राजा देवभक्त होता. गावात एक शंकराची पिंडी होती. त्याचा एक पुजारी
होता. तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. त्याला मधून
मधून देवदर्शन होत असे. राजा रोज देवळात जायचा. देवासाठी सोन्याच्या
ताटातून जेवण पाठवायचा. देवासाठी दानधर्म करायचा. राजाला वाटायचे, मी
देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही ? पुजारी तर देवाला
काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो ?एके दिवशी राजा देवळात गेला असतांना पुजारी पूजा करत होता. तेवढ्यात थोडा भूकंप झाला. देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. राजा लगेच पळून गेला. त्या वेळी पुजार्याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले.
– पू. (डाॅ) वसंत आठवले (अप्पाकाका)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ – बाेधकथा
‘बोधकथा’हा ग्रंथ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!
Comments
Post a Comment