Skip to main content

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

बक-यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बक-यांच्या कळपात वाढू लागले. बक-यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बक-याबें बें करीत. तसेच तेही बें बें करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बक-यांच्या कळपावर एका वाघाने आक्रमण केले. कळपातील गवत खाणा-या वाघाला पाहून तो रानातील वाघ आश्चर्यचकित झाला. धावत जाऊन त्याने त्या गवत खाणा-यावाघाला पकडले. तो बे-बें करून ओरडू लागला. रानातल्या वाघाने त्याला ओरडत फरफटत तलावापाशी नेले. मग तो त्याला म्हणाला, 'पहा, जरा पाण्यात आपले प्रतिबिंब पहा. पाण्यात तुझे तोंड दिसते आहे. नीट पहा, तू अगदी माझ्यासारखा दिसत आहेस आणि हे घे थोडेसे मांस खा'. असे म्हणून रानातल्या वाघाने त्याच्या तोंडात बळेबळे मांस कोंबले. आधी तो गवत्या वाघ मांस खायला सिद्ध होईना. तो एक सारखे बें बें करून ओरडत होता; पण थोडीशी रक्ताची चटक लागताच तो ते मांस आनंदाने खाऊ लागला. तेव्हा रानातला वाघ म्हणाला, 'कळले ना आता ? अरे, जो मी आहे तोच तू आहेस. चल आता माझ्यासह वनात.'
तात्पर्य :गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Comments

Popular posts from this blog

म्हातारे मांजर आणि उंदीर

  एक मांजर इतके म्हातारे झाले की, उंदराच्या मागे लागून त्यांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्यास राहिले नाही. मग उंदीर पकडण्याची सोपी युक्ती त्याने योजिली. घरात धान्याची पोती ठेवली होती, त्यातील धान्य खाण्यास रात्री उंदीर येत असत, हे लक्षात घेऊन ते मांजर एका पोत्याच्या आड उंदरांची वाट पाहात लपून बसले. हा प्रकार जवळच एक म्हातारा उंदीर बसला होता त्याने पाहिला व इतर उंदरांस कळविला. त्यामुळे एकही उंदीर त्या रात्री पोत्याजवळ आला नाही. अशा रीतीने त्या मांजराची ती युक्ती फुकट गेली. तात्पर्य - लुच्चेगिरी कितीही चातुर्याने केलेली असली, तरी ती बहुधा उघडकीस आल्याशिवाय राहात नाही.

The Crow and Snake | मराठी कथा | 3D Moral Stories For Kids in Marathi | Moral Values Stories Marathi

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales