Skip to main content

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

संघटितपणाचे महत्त्व

एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या
आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे

एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.

वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून
प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे

पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.

Comments

Popular posts from this blog

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

म्हातारे मांजर आणि उंदीर

  एक मांजर इतके म्हातारे झाले की, उंदराच्या मागे लागून त्यांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्यास राहिले नाही. मग उंदीर पकडण्याची सोपी युक्ती त्याने योजिली. घरात धान्याची पोती ठेवली होती, त्यातील धान्य खाण्यास रात्री उंदीर येत असत, हे लक्षात घेऊन ते मांजर एका पोत्याच्या आड उंदरांची वाट पाहात लपून बसले. हा प्रकार जवळच एक म्हातारा उंदीर बसला होता त्याने पाहिला व इतर उंदरांस कळविला. त्यामुळे एकही उंदीर त्या रात्री पोत्याजवळ आला नाही. अशा रीतीने त्या मांजराची ती युक्ती फुकट गेली. तात्पर्य - लुच्चेगिरी कितीही चातुर्याने केलेली असली, तरी ती बहुधा उघडकीस आल्याशिवाय राहात नाही.

The Crow and Snake | मराठी कथा | 3D Moral Stories For Kids in Marathi | Moral Values Stories Marathi