Skip to main content

Posts

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

विचारांचे बिंब-प्रतिबिंब

एक राजा आणि शेठजी यांची गाढ मैत्री होती. शेठजी चंदनाच्या लाकडांचा व्यापारी होता. ४-५ वर्षे त्याच्या लाकडाची विक्री झालीच नाही. त्याला असे वाटले की, हे लाकूड मूल्यवान आहे. हे लाकूड कोण विकत घेईल ? हे केवळ राजाच विकत घेऊ शकतो. शेठजीला असे वाटले की, राजा जर मेला, तर त्याला जाळण्याकरता चंदनाच्या लाकडांची आवश्यकता लागेल. त्यामुळे माझा व्यापार चांगला होईल. इकडे राजाच्या मनात शेठजींच्या विषयी कुभाव उत्पन्न झाला की, हा शेठजी निपुत्रिक आहे. जर हा मेला, तर याचे धन राज्य भांडारात जमा होईल. दोघांच्याही मनात असे कुविचार येऊन गेले. जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी एकमेकांना आपापल्या मनातील विचार सांगितले. राजाच्या मनात असे विचार यायचे कारण काय, तर शेठजींच्या मनात त्या राजाविषयी वाईट विचार आला; म्हणून राजाच्या मनात त्याची प्रतिक्रिया उमटली. राजाने शेठजींची कान उघडणी केली की, वाईट विचारांपेक्षा मनात चांगले विचार आणावे, उदा. राजाने आपल्या महालाचे दरवाजे चंदनाचे करावे आणि माझे सर्व चंदन विकले जावे. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

जगाला प्रसन्न करणे कठीण असणे !

काही केले, तरी लोक टीका करतात; म्हणून तिकडे लक्ष न देता आपल्याला योग्य वाटते त्यानुसार वागणे हितकर एकदा एक पिता-पुत्र एका घोड्याला घेऊन जात होते. मुलाने वडिलांना सांगितले, ‘‘तुम्ही घोड्यावर बसा, मी पायी चालतो. वडील घोड्यावर बसले. रस्त्याने जात असता लोक म्हणू लागले, ‘‘बाप निर्दयी आहे. लहान मुलाला उन्हातून चालवतो आणि आपण मात्र आरामात घोड्यावर बसला आहे. हे ऐकून वडिलांनी मुलाला घोड्यावर बसवले आणि आपण पायी चालू लागले. पुढे भेटलेल्या लोकांनी म्हटले, ‘‘मुलगा किती निर्लज्ज आहे पहा ! आपण तरुण धडधाकट असूनही घोड्यावर बसला आहे आणि बापाला पायी चालवतो आहे ! हे ऐकून दोघेही घोड्यावर बसले. पुढे गेल्यावर लोक म्हणाले, ‘‘हे दोघेही म्हसोबासारखे आहेत आणि छोट्याशा घोड्यावर बसले आहेत. बिचारा यांच्या वजनाने दबून जाईल. हे ऐकून दोघेही पायी चालू लागले. काही अंतरावर गेल्यानंतर लोकांचे बोलणे ऐकू आले, ‘‘किती मूर्ख आहेत हे लोक ? बरोबर घोडा आहे, तरीही आपले पायीच चालले आहेत. तात्पर्य : काही केले तरी लोक टीका करतात; म्हणून लोकांना काय आवडेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा भगवंताला आपण काय केलेले आवडेल, इकडे लक

अहंकार आला की, दुःख आले !

१. रथोत्सवाच्या वेळी रथाचे एक चाक तुटल्याने चिंतित झालेल्या भाविकांना पर्यायी कोणतेही वाहन न मिळणे एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसर्‍या गावात वाजत-गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात. त्यांना प्रश्‍न पडतो, रथातील देवाला दुसर्‍या गावाला कसे पोहोचवायचे ? भाविक पर्यायी म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही. २. भाविकांनी मार्गातील एका गाढवाला सजवून, त्याच्यावर देव ठेवून दुसर्‍या गावाकडे प्रयाण करणे आणिकाही जण गाढवालाही भक्ती-भावाने हार घालू लागणे मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात, रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्व जण दुसर्‍या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात. ३. मानसन्मानाने आनंदलेल्या गाढवाने पाठीवर ओझे आहे,असे वाटून अंग झाडल्याने देव खाली

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

बक-यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बक -यां च्या कळपात वाढू लागले. बक -यां सह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बक -या बें बें करीत. तसेच तेही बें बें करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बक -यां च्या कळपावर एका वाघाने आक्रमण केले. कळपातील गवत खाणा-या वाघाला पाहून तो रानातील वाघ आश्चर्यचकित झाला. धावत जाऊन त्याने त्या गवत खाणा-यावाघाला पकडले. तो बे-बें करून ओरडू लागला. रानातल्या वाघाने त्याला ओरडत फरफटत तलावापाशी नेले. मग तो त्याला म्हणाला, 'पहा, जरा पाण्यात आपले प्रतिबिंब पहा. पाण्यात तुझे तोंड दिसते आहे. नीट पहा, तू अगदी माझ्यासारखा दिसत आहेस आणि हे घे थोडेसे मांस खा'. असे म्हणून रानातल्या वाघाने त्याच्या तोंडात बळेबळे मांस कोंबले. आधी तो गवत्या वाघ मांस खायला सिद्ध होईना. तो एक सारखे बें बें करून ओरडत होता; पण थोडीशी रक्ताची चटक लागताच तो ते मांस आनंदाने खाऊ लागला. तेव्हा रानातला वाघ म्हणाला, 'कळले ना आता ? अरे, जो मी आहे तोच तू आहेस. चल आता म

भाव-भक्तीचे महत्त्व

भूकंप होत असतांना छप्पर पडून देवाला लागू नये, यासाठी पिंडीवर ओणवा होणारा भक्त पुजारी आणि देवळातून पळून जाणारा राजा ! एक राजा देवभक्त होता. गावात एक शंकराची पिंडी होती. त्याचा एक पुजारी होता. तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. त्याला मधून मधून देवदर्शन होत असे. राजा रोज देवळात जायचा. देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा. देवासाठी दानधर्म करायचा. राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही ? पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो ? एके दिवशी राजा देवळात गेला असतांना पुजारी पूजा करत होता. तेवढ्यात थोडा भूकंप झाला. देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. राजा लगेच पळून गेला. त्या वेळी पुजार्‍याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले. – पू. (डाॅ) वसंत आठवले (अप्पाकाका) संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ – बाेधकथा ‘बोधकथा’हा ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा !

सकारात्मक दृष्टीकोन कसा असावा ?

शिष्याच्या अयोग्य दृष्टीकोनाला गुरूंनी दिलेला सकारात्मक दृष्टीकोन दोन संन्यासी, म्हणजे गुरु-शिष्य ८ मासांनी (महिन्यांनी) पावसाळ्यात परत त्यांच्या झोपड्यांकडे आले. आल्यावर त्यांनी बघितले की, झोपड्यांचे अर्धे छप्पर उडून गेले आहे. शिष्य म्हणाला, ‘‘बघा, आपण भगवंताची आठवण करून करून मरतो, त्याचे फळ ! म्हणून मी सांगतो, प्रार्थना, पूजा इत्यादींत काही अर्थ नाही. दुष्टांचे बंगले चांगले राहिले आणि आपल्या झोपड्या पडल्या.’’ ज्या वेळी तो हे रागाने सांगत होता, त्या वेळी गुरु आनंदाने परमात्म्याला सांगत होते, ‘परमात्म्या, तुझी कृपा म्हणून अर्धे छप्पर अजूनही आहे.’ शिष्य चिंतेत होता; म्हणून त्याला रात्रभर झोप लागली नाही. गुरु पहाटे उठले, त्या वेळी अर्ध्या छपरातून चंद्र दिसत होता. त्यांनी कविता लिहिली. त्या कवितेत होते, ‘देवा, आम्हाला आधीच ज्ञात असते, तर आम्ही आधी अर्धेच छप्पर बांधले असते. आता आम्ही झोपतांना चंद्रही बघू शकतो !’ संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’

संघटितपणाचे महत्त्व

एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे