Skip to main content

Posts

Showing posts from August, 2017

फ़ूड ट्रक कहानी food truck Hindi Kahaniya | Hindi Stories | Bedtime Moral Stories Hindi Fairy Tales

अकबर-बिरबल कथा : कोण शहाणा, कोण मूर्ख ?

दरबारातील मंडळींना एकदा बादशहाने विचारले, ''कोणाला शहाणा म्हणावे आणि मूर्ख कोणाला म्हणावे?''  यावर दरबारी मंडळी उत्तरादाखल बरेच मोठे चर्‍हाट वळू लागली असता बादशहा भडकून बिरबलाला म्हणाला, ''बिरबल, तू दे बर माझ्या प्रश्नाचे उत्तर!'' यावर बिरबल म्हणाला, ''महाराज, जो माणूस मनात योजलेले बेत मेहनत, चिकाटी आणि योजना करून तडीस नेतो, तो शहाणा, आणि नुसतेच मोठमोठे बेत करून जो माणूस ते विसरून जातो किंवा योजलेली कामे तडीस नेण्यासाठी त्याची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेत सोडून देतो, तो मूर्ख.'' बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा समाधान पावला.

कुत्र्याची हुशारी

एकदा एक कुत्रा जंगलात रस्ता विसरून गेला. त्याने पाहिले की समोरहून एक वाघ त्याच्याकडे येत आहे. कुत्रा घाबरू लागला आणि विचार करून लागला की अता माझा शेवटचा क्षण जवळ आला. तेवढ्यात त्याला बाजूला वाळलेली हाडे दिसली. तो समोरहून येत असलेल्या वाघाकडे पाठ करून बसून गेला आणि एक वाळकं हाड चोखत जोर-जोराने बोलू लागला, 'वाह वाघ खाण्याचा मजा काही वेगळाच आहे. एक अजून मिळाला असता  तर पोट भरून गेलं असतं' असे म्हणून त्याने जोरात ढेकर दिला. हे ऐकून वाघ घाबरला. त्यांनी विचार केला की हा कुत्रा तर वाघाचा शिकार करतो. येथून आपले प्राण वाचवून पलायन करणेच योग्य ठरेल आणि तो वाघ तेथून पळत सुटतो.   झाडावर बसलेला माकड हे सगळं बघत असतो. तो विचार करतो की ही चांगली संधी आहे, मी आता वाघाकडे जातो आणि या कुत्र्याची हुशारी उघडतो. अशाने मी वाघाचा मित्र होईन आणि जीवनभर वाघापासून माझ्या जीवाचा धोकाही टळेल. असा विचार करून तो वाघाचा मागे जातो.

अकबर-बिरबल कथा - तू तर कमालच केलीस!

बिरबलाचा दरबारात जाण्याचा तो पहिलाच दिवस होता. दरबाराचे थोडे-फार काम झाल्यावर बादशाहाने बिरबलाला विचारले, '' बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते, तितक्याच आनंदाने ती निघून जाते का?'' बिरबल : होय महाराज.  बादशाहा : कशावरून म्हणतोस ?  बिरबल : आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी वेळेवर येते ना ? जर ती आनंदाने गेली नसती, तर ती पुन्हा परत आली असती का?  बादशाहा : वा रे पठ्ठे ! बिरबल, तू तर कमालच केलीस. 

राक्षस, चोर आणि ब्राह्मण

नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण

गाढव आणि लांडगा

  एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले. तात्पर्य - काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.

घोडा आणि रानडुक्कर

  एक तहानलेला घोडा एका ओढयावर पाणी पिण्यास गेला असता, एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोडयास पाणी पिऊ देईना, त्यामुळे त्या दोघांचे भांडण जुंपले. रानडुक्कराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोडयाने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंती मान्य करून हाती शस्त्रे घेतली व त्या घोडयावर बसून तो डुकरास शासन करण्यास निघाला. ओढयाजवळ गेल्यावर त्याने एक तीर सोडून त्या डुकराचा तात्काळ प्राण घेतला. आपल्या शत्रूचे आपल्या देखत पारिपत्य झालेले पाहून घोडयास मोठा आनंद झाला, त्याने त्या माणसाचे फार आभार मानले व ‘मला आता घरी जाण्यास आज्ञा असावी’ असे तो म्हणाला. परंतु माणसाने त्यास जाऊ दिले नाही. तो म्हणाला, ‘तुझा मला पुष्कळ उपयोग होईल असे वाटते व म्हणूनच मी तुला माझ्या तबेल्यात नेऊन बांधणार’ हे ऐकताच, क्षुल्लक गोष्टीसाठी आपले स्वातंत्र्य कायमचे गमाविल्याबद्दल घोडयास फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य - दुसऱ्याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एकादयाची गुलामगिरी पत्करतो, तेव्हा ती गुलामगिरी कायमचीच आपल्या गळ्यात पडेल की काय याचा चांगला विचार

करडू, बोकड आणि लांडगा

एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार? तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’ करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’

म्हातारे मांजर आणि उंदीर

  एक मांजर इतके म्हातारे झाले की, उंदराच्या मागे लागून त्यांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्यास राहिले नाही. मग उंदीर पकडण्याची सोपी युक्ती त्याने योजिली. घरात धान्याची पोती ठेवली होती, त्यातील धान्य खाण्यास रात्री उंदीर येत असत, हे लक्षात घेऊन ते मांजर एका पोत्याच्या आड उंदरांची वाट पाहात लपून बसले. हा प्रकार जवळच एक म्हातारा उंदीर बसला होता त्याने पाहिला व इतर उंदरांस कळविला. त्यामुळे एकही उंदीर त्या रात्री पोत्याजवळ आला नाही. अशा रीतीने त्या मांजराची ती युक्ती फुकट गेली. तात्पर्य - लुच्चेगिरी कितीही चातुर्याने केलेली असली, तरी ती बहुधा उघडकीस आल्याशिवाय राहात नाही.

रानमांजर आणि वाघूळ

एक रानमांजराने एक वाघूळ पकडले; तेव्हा त्याने आपणास सोडून देण्याविषयी रानमांजरास विनंती केली. ती ऐकून मांजर म्हणाले, ‘छे, छे. माझ्या हाती मिळालेल्या पक्ष्यांस मी कधी जिवंत सोडीत नाही.’ वाघूळ म्हणाले, ‘पण, मी पक्षी नव्हे, जनावर आहे. माझे तोंड तुला उंदराच्या तोंडासारखे दिसत नाही काय?’ हे ऐकताच त्या मांजराने त्यास सोडून दिले. पुढे काही दिवसांनी दुसऱ्या एका रानमांजराच्या हाती ते वाघूळ सापडले. त्या मांजरास उंदरासंबंधाने मोठी चीड होती. वाघूळ हात जोडून त्यास म्हाणाले, ‘बाबा रे, मला गरीबाला सोडून दे, मारू नकोस.’ मांजर म्हणाले, ‘तू उंदरासारखा दिसतोस, तुला मी कधीही सोडणार नाही.’ वाघूळ म्हणाले, ‘दादा, मी उंदीर नाही, पक्षी आहे. हे माझे पंख पहा.’ ऐकताच त्या रानमांजरानेही त्यास सोडून दिले. तात्पर्य - आपण दोन्ही बाजूंचे आहो असे भासविणे एखादे वेळी फायदेशीर होते, पण तसे करणे एकंदरीत भयंकर आहे.

मेले कोण - नेले कुणाला - चातुर्य कथा

इंग्रज राज्यकर्त्यांविरुध्द महात्मा गांधीनी सुरु केलेली सन १९४२ ची ‘छोडे भारत’ चळवळ ऎन जोमात होती. क्रांतीवीर नाना पाटील यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ‘पत्री सरकार’ म्हणजे ‘प्रति सरकार’- स्थापन करुन, इंग्रजांच्या तोंडाचं पाणी पळविलं होतं. नाना पाटलांना जिवंत पकडता न आल्यास; त्यांना गोळी घालून ठार करण्याचा गोऱ्या सरकारचा हुकूम सुटला होता. अशा कठीण परिस्थितीत नानांची वृध्द आई मॄत पावली. नाना मातृभक्त; तेव्हा आईच्या अंत्यदर्शनाला ते नक्की येणार, याबद्दल इंग्रज सरकारला शंका नव्हती. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे ते घरी आलेही. त्यांनी घरात प्रवेश करताच, टेहेळणीवर असलेल्या गोऱ्या सरकारच्या शिपायांनी त्यांच्या घराच्या अंगणाआवाराभोवती पक्का गराडा घातला. थोड्या वेळानं हाराफ़ुलांनी आच्छादून गेलेलं प्रेत लोकांने घरातून उचलून आणून, ते ओसरीवर तयार करुन ठेवलेल्या ताटीवर ठेवलं व लगेच ताटी उचलण्यात आली. त्याच वेळी घराच्या मागल्या बाजुनं एक मनुष्य एक बैलगाडी हाकीत पुढल्या अंगणात आला. त्य बैलगाडीत नानांच्या आईसाठी स्मशानात चिता रचण्याकरिता लागणारी जाडजाड लाकडं खच्चून भरली होती. पुढे त

पुढ्यात पैसे नाही ठेवले - चातुर्य कथा

एक गृहस्थ महात्मा गांधीकडे गेला व त्यांची भेट होताच त्यांना म्हणाला, ‘आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आयुष्यात आपण काही तरी मिळवलं असं आता मला वाटू लागलयं.’ याप्रमाणे तो निघून जाऊ लागला असता म्हात्माजी त्याला म्हणाले, ‘माझ्या दर्शनानं काहीतरी मिळाल्यासारखं तुम्हाला वाटतयं, तुमच्या भेटीनं मलाही काहीतरी नको का वाटायला ?’ गांधीजींच्या या प्रश्नानं गोंधळून गेलेला तो गृहस्थ त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला असता ते पुढं म्हणाले, ‘अहो, तुम्ही ‘दर्शन’ हा शब्द वापरुन मला अगदी देवपदी बसवलतं ना? मग देवाचं दर्शन घडताच त्याच्यापुढे जसे पैसे ठेवले जातात, तसेच तुम्हीही माझ्यापुढे थोडेफ़ार पैसे नको का ठेवायला ? तुम्ही तर नुसतचं दर्शन घेऊन चाललात ! तुम्ही माझ्यापुढे जर पैसे ठेवले असते, तर ‘हरिजन निधी’ साठी मलाही तुमच्याकडून काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं असतं. महात्माजींच्या या खुलाशानं आश्रमवासी मंडळीत हास्याची खसखस पिकली, पण त्याचबरोबर, कारण नसता उगाच महात्माजींचा वेळ घ्यायला आलेल्या त्या गृहस्थानं तिथून जाण्यापूर्वी त्यांच्या हरिजण निधीला काही रक्कम देणगी म्हणून दिली.

चतूर चिंतामणी - चातुर्य कथा

दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन चालु होत. दिवंगत श्री चिंतामणराव देशमुख हे त्या वेळी भारताचे अर्थंमंत्री होते. एका दिवशी लोकसभेत आपल्या पंचवार्षिक योजनांच्या परिपुर्तीसाठी भारत परराष्ट्रांकडुन घेत असलेल्या कर्जाच्या संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्षीय खासदार यांच्यात कडाक्याची चर्चा चालु झाली असता, ओरिसातील एक विरोधी पक्षीय खासदार श्री. पी. सी. भंजदेव म्हणाले, ‘परराष्ट्रांकडुन कर्जे काढून देशाला कर्जबाजारी करणाच्या या धोरणामुळे संबंधित मंत्रीमहोदय हे देशाचे शत्रु असल्याचे सिध्द होत आहे. कारण सुभाषितकारांनी म्हटलचं आहे, ऋणकर्ता पिता शत्रु :। ’ श्री. भजंदेव यांचे हे विधान ऎकताच, अर्थशास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेले चिंतामणराव देशमुख तत्काल उभे राहिले आणि श्री. भजंदेव यांनी उदधृत केलेल्या संस्कृत वचनांची समस्यापूर्ती करण्याची सभापतींकडे परवानगी मागून ते एकून उपस्थित खासदारांना उद्देशून म्हणाले, ‘श्री. भजंदेव यांनी केलेला आरोप पुर्णतया चुकीचा आहे. कारण.. ऋणकर्ता पिता शत्रुर्न तु मंत्रि: परं तथा। ऋणं दु:खाय पुत्राणां, राष्ट्राणां तु हिताय तत। अर्थ - कर्ज करुन ठेवणारा पिता ह

ओवाळणी - चातुर्य कथा

एका गृहस्थाला दोन मुले होते, एकाचं लग्न झालं होतं तर दुसऱ्याच व्हायचं होत. मृत्यूसमय जवळ येताच आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, ‘ तुमच्यासाठी मी बरीच शेतीवाडी ठेवली आहे; मोठा वाडाही आहे, शिवाय तुम्हा दोघांनाही चांगल्या नोकऱ्या आहेत, तेव्हा एकीनं व प्रेमानं वागा. तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. परंतू जर का तुम्ही केवळ आपापला स्वार्थच बघत राहिलात, तर मात्र खाऊन पिऊन केवळ दिवस ढकलणाऱ्या जनावरांच्या जिवणाची आवकळा तुमच्या जिवनाला येईल.’ याप्रमाणे उपदेश केला आणी थोड्याच दिवसात त्या गृहस्थाने या जगाचा निरोप घेतला. तो गृहस्थ वारला आणि वर्षभरात त्याच्या धाकट्या मुलाचं लग्न झालं. त्याची बायको अतिशय स्वार्थी होती. तिनं आपल्या नवऱ्यामागे वेगळी होण्याची भुणभुणं लावली. अख्रेर तो मोठ्या भावाकडे गेला व त्याला म्हणाला, ‘दादा, हिची इच्छा आहे तेव्हा आपण वेगळं होऊया.’ मोठ्या भावानं धाकट्या भावाच्या म्हणण्याला नाइलाजानं मान्यता दिली; एकाच घरात दोघांची दोन बिऱ्हाडं झाली; आणि वडिलोपार्जीत मालमत्तेची दोघां भावांमध्ये सारखी वाटणी झाली. राहता राहिली परसदारी राहील

समर्थ रामदास स्वामी

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज । अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥ समर्थ रामदास स्वामी सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे. भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. परंतु ‘चातुर्य’ म्हणजे काय, हे ठाऊक आहे? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा, मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन. माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला तर आपण या प्रसंगात का सापडलो याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो, थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर च

उंटाचे प्रथमदर्शन

खाटीक आणि कुत्रा

एक खाटीक आपल्या दुकानात बेसावधपणे बसला असता, एका कुत्र्याने त्याच्या दुकानातून मांसाचा एक मोठा तुकडा पळविला. हा प्रकार पाहून खाटीक कुत्र्यास म्हणतो, ‘गडया, तू माझे मांस चोरून मला जे शहाणपण शिकविलेस ते मी कधीही विसरणार नाही.’ तात्पर्य - पदरची एखादी जिन्नस गेल्यावर मनुष्यास जे ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान तो सहसा विसरत नाही.

गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले. तात्पर्य - काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.

शेतकरी आणि बकरे

  एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तेव्हा एका शेतकऱ्याने आपल्याजवळच्या कोंबडया मारून खाल्ल्या. कोंबडया संपल्यावर त्याने कोकरांना मारून खाण्यास सुरुवात केली. ते पाहताच सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार. त्याऐवजी आपण आधीच येथून पळून गेलेले बरे. असा विचार करून ते तेथून पळून गेले. तात्पर्य - पुढच्या संकटाची जाणीव होताच, ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय.

शेळी, करडू आणि लांडगा

एक शेळी सकाळी उठून, चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली, त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, “बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.’ ‘सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो,’ असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे. इतरांस दार उघडू नको.” हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपटाच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, ‘सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवे.’ शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते; पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते खिडकीतूनच लांडग्यास म्हणाले, ‘तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?’ हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला. तात्पर्य - फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधाने शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.

शेळी आणि कावळा

एकदा एक कावळा एका गरीब शेळीच्या पाठीवर बसून तिच्यावर चोची मारू लागला. तेव्हा शेळी त्याला म्हाणाली, ‘अरे, तू माझ्यासारख्या गरीबाला टोचतोस त्यापेक्षा जर कुत्र्याला टोचशील तर तू खरा.’ त्यावर कावळा म्हणाला, ‘कुणालाही त्रास देण्यापूर्वी मी त्याच्याकडून आपल्याला त्रास होणार नाही ना असा विचार करतो. जे शक्तिवान आहेत त्यांच्या वाटेला मी कधीच जात नाही, पण जे दुबळे आहेत त्यांना मात्र मी भरपूर त्रास देतो.’ तात्पर्य - जो मनुष्य इतरांना त्रास देतो कुणालातरी भीतच असतो.

पोपट आणि चिमणी

एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तो तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे. तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसऱ्या कोणास कचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसऱ्या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे, ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’ तात्पर्य - कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.

दोघे मुलगे आणि दुकानदार

दोन तरुण मुलगे एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून, त्यापैकी एकाने एक लाडू चोरला आणि तो दुसऱ्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला. लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला, ‘तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडू चोरला होता, तो म्हणतो, ‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’ ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो, ‘मीही शपथ घेऊन सांगतो की, मी काही तुमचा लाडू चोरला नाही.’ दुकानदार म्हणाला, ‘तुम्हा दोघापैकी कोणी लाडू चोरला, हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकी एक असामी चोर असून, तुम्ही दोघेही लबाड आहात, हे मी अगदी खात्रीने सांगतो.’ तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.

मुरलीवाला कोळी

एक कोळी, मासे धरण्याच्या कामापेक्षा मुरली वाजविण्याच्या कामात फार कुशल होता. एके दिवशी तो नदीकाठी जाऊन मुरली वाजवित बसला असता मुरलीच्या आवाजाने एकही मासा जवळ न आल्यामुळे त्याने आपली मुरली ठेवून दिली व जाळे घेऊन ते पाण्यात घातले. थोडयाच वेळात पुष्कळ मासे त्या जाळयात सापडले. ते पाहताच तो कोळी म्हणतो, ‘हे मासे किती अरसिक ! इतका वेळ मी मुरली वाजवित होतो, तिच्या सुरावर हे नाचले नाहीत आणि आता वाजविणे बंद होताच हे नाचू लागले !’

सिंह आणि गाढव

एका उन्मत्त झालेल्या गाढवाने एका सिंहास निष्कारण शिव्या दिल्या. त्या ऐकताच सिंहास मोठा संताप आला, परंतु शिव्या देणारा प्राणी गाढव आहे, हे पाहताच त्याने आपला संताप आवरला. त्या गाढवाकडे ढुंकूनही न पाहता किंवा त्याला एक शब्दही न बोलता तो सिंह आपल्या वाटेने चालता झाला. तात्पर्य - जे खरे थोर आहेत, ते हलकट लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.

गरुड आणि घुबड

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गर